सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग पाठ्यपुस्‍तक

आकार- १४×२२ से.मि, पृष्‍ठसंख्‍या-३८२, रंगीत चित्रे-०८, आकृत्‍या-३७ पुस्‍तक सेवा देणगीमूल्‍य रूपये- २५० + ४० पोस्‍टेज भारतात. COPY RIGHTS. (ISBN) 978-81-924424-0-2

विभाग एक पूर्वार्धः यामध्‍ये सूर्यनमस्‍काराचे धार्मिक अधिष्‍ठान स्‍पष्‍ट करून ब्रह्मकर्मांतर्गत नित्‍यकर्म असलेली सूर्यनमस्‍कार स्‍वयं साधना मनाने मनावर घ्‍यावी यासाठी मनाची मनधरणी केलेली आहे.

विभाग दोन सूर्यनमस्‍कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग कृतिपुस्तिकाः मन-बुद्धीचे सामर्थ्‍य वापरून सूर्यनमस्‍कारातून शरीरशक्‍ती कार्यांन्वित करण्‍याचा प्रयत्‍न कसा करायचा याचे मार्गदर्शन कार्यपुस्तिकेमध्‍ये केलेले आहे. प्रत्‍येक आसनाचे स्‍पष्‍टीकरण चार विभागात दिलेले आहे-

आसन करण्‍याची सर्वसाधारण पध्‍दत,

आसनामधील विविध कौशल्‍य,

आसनामध्‍ये चूक झाल्‍यास होणारा स्‍नायूक्षोभ,

चूक टाळण्‍यासाठी सावधान.

विभाग तीन उत्‍तरार्ध- बुद्धीने या साधनेमध्‍ये सहभागी व्‍हावे यासाठी त्‍याची स्‍मृती जागृत करण्‍याचा प्रयत्‍न यामधे केलेला आहे. तसेच प्रगत सूर्यनमस्‍कार स्‍पष्‍ट करतांना समंत्रक सूर्यनमस्‍कार, व्‍यक्तिमत्‍व विकासाचा आधार. साधकांचे शंकासमाधान आणि इतर अकरा परिशिष्‍ट्ये दिलेली आहेत.

विभाग चार- ब्रह्मकर्मांतर्गत नित्‍यकर्म प्रथम दिवस / प्रशिक्षण वर्ग समाप्‍ती साधना.

बॅंकेमध्‍ये परस्‍पर पैसे भरणार असल्‍यास

श्रीसूर्यस्‍थान समर्थ विद्यारोग्‍य केंद्र, नासिक

बचत खाते क्रमांक- 600 634 54 976
IFSC: MAHB 0000214

बॅंक ऑफ महाराष्‍ट्र, कॉलेज कॅंपस शाखा, नासिक-०५

आपला पूर्णपत्‍ता- पोष्‍टाचा पिनकोड नंबर, दूरध्‍वनी / भ्रमणध्‍वनी क्रमांक सहीत- कळवावा. रजिस्‍टर पोष्‍टाने पुस्‍तकाची प्रत पाठविली जाईल. आभार.